top of page
Search
vaibhavisamant001

उपवास, शास्त्र आणि बरंच काही...

Updated: Mar 6, 2021



परवा बातम्या वाचत असताना, एका ठळक अक्षरातल्या शिर्षकावर नजर गेली. उषा सोमण या वयाच्या एक्याऐशीव्या वर्षी सांदकाफु ट्रेक पुर्ण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. उत्सुकतेपोटी युट्युब वर त्यांची जुनी मुलाखत पाहिली. व्यायामा सोबतच योग्य आहार आणि आहार पद्धती फार महत्त्वाची असते, यावर त्या बोलताना भर देत होत्या. आता आहार पद्धती म्हणजे नेमक काय? तर आपण काय खातो? याच सोबत कसं आणि कधी खातो? हे सुद्धा फार महत्त्वाच आहे. पुर्वीच्या काळी डाएट किंवा जिमच फॅड नव्हत, तरी बायका फार जाड नव्हत्या, कदाचित श्रद्धेने केलेल्या उपवासातच त्यांच डाएट समाविष्ट असावं. हल्ली उपास तापास आपण फारसे पाळत नाही किंबहुना ते पाळणं शक्य होत नाही. मी लहान असताना मात्र आजी बरेच उपवास करायची, त्यात महाशिवरात्रीचा उपवास फार कडक असायचा. पण तिच्या उपवासाचं निमित्त करुन आम्ही खिचडी, साबुदाणा वडे किंवा शिखरणावर मनसोक्त ताव मारायचो. तु जर वडे खाणार नसलीस, तर तुझ्या उपवासाच फायदा काय? असा भाबडा प्रश्न मी तिला विचारला, की ती नेहमी गलातल्या गालात हसायची. कारण उपवासाच थालीपीठ, बटाट्याचा किस, खोबऱ्याच्या वड्या असलं काही खायचं नसेल, तर उपवास केल्याचा फायदा नसतो. हे माझं आणि आजोबांच ठाम मत होतं. राजगिऱ्याचा लाडु आणि शेंगदाण्याची चिक्की शाळेत घेऊन गेलं की माझ्या डब्याचा आणि पर्यायाने माझा भाव वाढायचा. शास्राप्रमाणे पुण्य मिळावं म्हणुन उपवास करतात. विज्ञानाच्या दृष्टीकोनातुन बघायचं झालं तर पोटाला आराम मिळावा, पचनक्रिया सुधारावी म्हणुन उपवास करतात. त्या दिवशी पचायला हलके असलेले पदार्थ आणि प्रामुख्याने फळं खातात. पण खव्वयांच शास्त्र सांगतं, दिवसभर चटक मटक पदार्थ खाता यावे आणि संध्याकाळी गरम गरम वरण भात आणि रवाळ तुप जेवून दिवस सार्थकी लागावा म्हणुन उपवास करतात.

संकष्टी जशी मोदकांसाठी राखुन ठेवलेली असते तशीच महाशिवरात्र ही गरमा गरम शिंगाड्याच्या पुऱ्यांसाठी राखीव असते. हल्ली उपवासाची मिसळही मिळते, कदाचित जास्तीत जास्त लोकांनी खाण्यासाठी उपवास धरावा म्हणुन दाखवलेलं चविष्ट आमिष असावं. रोजच्या त्याच त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर या शिवरात्रीला चवीत बदल म्हणुन उपवास करायचा बेत आखायला हरकत नाही. खादाड खवय्यांचे उपवास सुकर आणि चविष्ट व्हावेत या साठी गिरगांव कट्ट्याचं स्वयंपाकघर कंबर कसुन काम करतय. त्या मुळे जर करायचा असेल फराळी मेजवानीचा चट्टामट्टा तर गाठायलाच हवा गिरगाव कट्टा.....

:सोनचाफा



128 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page